Pimpri Chinchwad : रोडरोमीओंकडून एका दिवसात सव्वालाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज –  शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थीनीना त्रास देणाऱ्या रोडरोमीओंकडून पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) आयुक्तालयाने कारवाई करत सव्वा लाखांचा दंड वसूल केला आहे. हि कारवाई शुक्रवारी (दि.22) करण्यात आली.

विनाकारण रोडवर फिरून शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थींनी किंवा नागरिकांना त्रास देणाऱ्या रोडरोमीओंवर आयुक्तालयातर्फे वेळोवेळी कारवाई करण्यात येते. त्यानुसार शुक्रवारी 67 शाळा व महाविद्यालयाच्या आवारात फिरणाऱ्या 25 रोडरोमीओंवर महाराष्ट्र पोलीस ऍक्टनुसार कारवाई करण्यात आली, तर दोघांवर भारतीय दंड संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. तर, 153 जणांवर विनाकारण परिसरात मोटार घेऊन फिरत असल्याने कारवाई केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 1 लाख 38 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला.

Pimpri Corona Update: शहरात आज 195 नवीन रुग्णांची नोंद; 183 जणांना डिस्चार्ज

यापुढेही आयुक्तालयाकडून अशी कारवाई (Pimpri Chinchwad) केली जाणार असून रोडरोमीओंकडून छेडछाड किंवा इतर अनुचित प्रकार आढळल्यास पोलीसांकडे तक्रार करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.