Pimpri Corona Update: शहरात आज 195 नवीन रुग्णांची नोंद; 183 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध (Pimpri Corona Update) भागातील 195 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 183 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 625 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 66 हजार 586 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 334 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 325 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Chakan : किरकोळ कारणावरून टोळक्यांचा राडा, कोयत्याने दोघांना मारहाण

तर, केवळ 9 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये (Pimpri Corona Update) दाखल आहे. आज दिवसभरात 2 हजार 887 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 98 हजार 76 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.