Chakan : किरकोळ कारणावरून टोळक्यांचा राडा, कोयत्याने दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून सात-आठ जणांच्या टोळक्यांनी राडा घातला (Chakan) असून, यामध्ये कोयत्याने दोघांना जखमी केले आहे. हि घटना गुरुवारी (दि.21) सायंकाळी साडेसहा वाजता वासुली फाटा येथे घडली असून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील संदेश संजय पडवळ (वय 19 रा.आवळेवस्ती) याला अटक केली असून इतर सात ते आठ जण फरार झाले आहेत. याप्रकरणी अक्षय अनिल ठुले (वय 25 रा.भांबोली) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वासुली फाटा येथील करण कॉम्प्लेक्समध्ये किराणा दुकान आहे. तेथे ते कामासाठी गेले होते. यावेळी कॉम्प्लेक्स जवळ आलेल्या दोघांना कॉम्प्लेक्सच्या मालकाचा मुलगा करण याने हटकले. त्या तिघांमध्ये शिवीगाळ करत भांडणे झाले. या घटनेच्या 15 ते 20 मिनिटांनी तेथे 8 ते 9 जण हातात कोयते व लाकडी दांडके घेऊन आले. यावेळी करण हा घरात पळून जाऊन लपला.

Thorat Misal : मिसळ खाण्यासाठी आलेल्या ग्राहकाला आरेरावी

गोंधळ पाहून फिर्यादी तेथे गेले. त्यावेळी टोळक्यातील दोघांनी त्यांच्या डोक्यात वार केले व लोखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी करणची बहीणही बाहेर आली असता तिलाही मारहाण करण्यात आली व तिच्या गळ्यातील सोन्याचे गंठण कोणी तरी चोरले. या मारहाणीत त्या (Chakan) जागीच बेशुद्ध पडल्या. चाकण पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.