Kamshet : पार्थ पवार यांच्या प्रचार संपर्क कार्यालयाचे कामशेत येथे उदघाटन

एमपीसी न्यूज- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या वतीने मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचार संपर्क कार्यालयाचे उदघाटन पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासनाना देवकाते यांच्या हस्ते कामशेत येथे करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व कात्रज दुध डेअरीचे माजी चेअरमन विद्यमान संचालक बाळासाहेब नेवाळे, मावळ तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष गणेश ढोरे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, मावळ तालुका प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेव ठुले, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश पवार, जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष काळुराम मालपोटे, जिल्हा परिषद सदस्या कुसुमताई काशीकर, पंचायत समिती गटनेते दत्तात्रय शेवाळे, पंचायत समिती सदस्य महादु उघडे, पंचायत समिति सदस्या राजश्री राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेस माजी युवक अध्यक्ष रमेश गायकवाड, राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले, खरेदी विक्री संघाचे संचालक बुवामामा कदम, माउली गोणते, पवन मावळ राष्ट्रवादी अध्यक्ष माउली निम्बळे, संतोष राऊत, माजी उपसरपंच तानाजी दाभाड़े, कामशेत शहरअध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य गजानन शिंदे, माजी सरपंच प्रकाशराव आगळमे, चेअरमन रूपेश घोजगे, लालाभाऊ गोणते पत्रकार रामदास वाडेकर, अंदर मावळ युवक अध्यक्ष शेखर मालपोटे, प्रसिद्धी प्रमुख गणपत विकारी उपस्थित होते.

यावेळी बाळासाहेब नेवाळे म्हणाले, “गेल्या तीन वर्षा पूर्वी मावळ तालुक्यातील सर्व गावामधे जाऊन संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराघरामधे पोहचवला आहे. गावागावात जाऊन पक्षाच्या बैठका घेऊन कार्यकारणी केली होती. शरद पवार साहेबांचे विचार आचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून केले जात आहे” आगामी लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांच्या विजयासाठी मावळ तालुक्यातील सर्व गावागावात जाऊन कार्यकर्ते व पदाधिकारी यांची भेट घेऊन मोर्चेबांधणी करून जास्तीत जास्त मताधिक्य मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सूत्रसंचालन मावळ तालुका विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष अमोल केदारी यांनी केले. आभार माजी उपसरपंच नाणे मावळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष किरणभाऊ हुलावळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.