Kamshet : पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या कामशेत शाखेचे रविवारी उदघाटन

एमपीसी न्यूज- पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या कामशेत शाखेचे उदघाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते रविवारी (दि. २) सकाळी साडेदहा वाजता करण्यात येणार आहे अशी माहिती पतसंस्थेचे संस्थापक गणेश भेगडे यांनी दिली आहे.

शिवाजी चौक कामशेत येथे हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे असून प्रमुख पाहुणे म्हणून भाजप मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे व पुणे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, मावळचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला संस्थेचे हितचिंतक, सभासद व ठेवीदार या सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष दत्ताभाऊ नाटक, सचिव मंगेश सरोदे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.