Karvenagar : लॅपटॉप चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी पकडले रंगेहात

एमपीसी न्यूज : दरवाज्यावर ठेवलेली चावी घेऊन (Karvenagar) घरातील लॅपटॉप चोरी करणाऱ्या चोराला कर्वेनगर पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून सहा लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी, की कर्वेनगर परिसरात हॉस्टेल, बिल्डिंगमध्ये प्रवेश करुन बूट किंवा दरवाज्यावर ठेवलेल्या चावी घेऊन रुममधील लॅपटॉप चोरी करणाऱ्या युवकाला वारजे माळवाडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.

Alandi : आळंदी येथे जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 12 लॅपटॉप, दोन दुचाकी, एक कॅमेरा आणि लॅपटॉप चार्जर चोरल्याचे समोर आले आहे. (Karvenagar) पोलिसांनी विविध सीसीटिव्ही तपासल्यानंतर अर्जुन तुकाराम झाडे याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अनेक ठिकाणीं चोरी केल्याचं स्पष्ट झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.