Kasaba Election : देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘आम्ही पुन्हा येऊ’

एमपीसी न्यूज : भाजपचा कसब्यामध्ये पराभव (Kasaba Election) तर चिंचवडमध्ये विजय झाल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच, ‘आम्ही पुन्हा येऊ’ म्हणत पुढच्या वर्षीची कसब्यातील जागा मिळवण्याचा निश्चय केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की चिंचवड विधानसभा क्षेत्रातून आमच्या भाजपा उमेदवार अश्विनीताई जगताप या विजयी झाल्या. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विकासाला साथ देणाऱ्या चिंचवडवासियांचे मनापासून आभार! स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांना ही भावपूर्ण आदरांजली आहे, असे त्यांनी म्हंटले.

तर, कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार म्हणत ते पुढे म्हणाले, की जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले आहेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले, तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करतो. पण, एक नक्की सांगतो, आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’! असे म्हंटले आहे.

कसब्यामध्ये कॉँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव (Kasaba Election) केला तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीच्या नाना काटे यांचा पराभव केला आहे.

Chinchwad Bye-Election: नैतिकदृष्ट्या भाजपचा पराभवच – अजित गव्हाणे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.