BNR-HDR-TOP-Mobile

Khadaki : दारूचा वाद बेतला जीवावर, डोक्यात दगड घालून एकाची हत्या

186
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- दारू पिण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून डोक्यात दगड घालून एकाची हत्या करण्यात आली. खडकीतील लष्करी अधिकाऱ्यांच्या स्टाफसाठी दिलेल्या बंगल्यात हा प्रकार घडला.

गोपाल अर्जुन कांबळे (वय 29) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी (दि. १३) मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत युवक आणि आरोपी दारू पिण्यासाठी खडकीतील वर नमूद केलेल्या बंगल्यात एकत्र आले होते. यावेळी त्यांच्यात दारू पिण्यावरून वाद झाला आणि पाच जणांनी गोपाल याला बेदम मारहाण केली. तर एकाने त्याच्या डोक्यात दगड घातला आणि खून केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3