Khadki : फुकट सूप देणे हॉटेल चालकाला पडले महागात; हॉटेलचालकावर वार

एमपीसी न्यूज : फुकट सूप देणे हॉटेल चालकाला (Khadki) महागात पडल्याची घटना खडकी येथे घडली. ग्राहकांना जेवणापूर्वी फुकट सूप देणाऱ्या एका हॉटेलचालकाच्या डोक्यात हत्याराने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्यावसायिक स्पर्धेतून हे प्रकरण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मुलायम रामकृपाल पाल (वय 27) असे जखमी झालेल्या हॉटेलचालकाचे नाव असून त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यावरून सिद्धार्थ भालेराव आणि दिग्विजय गजरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाल यांचे खडकी बाजार परिसरात ‘ओ शेठ’ नावाचे हॉटेल आहे. त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फुकट सूप देण्याची योजना सुरू केली. दुसऱ्या बाजूला, आरोपी भालेराव आणि गजरे यांची त्याच परिसरात खाद्यपदार्थ विक्रीची गाडी आहे.

PCMC : वाहन दुरुस्ती कार्यशाळा विभागाचे नामकरण

पाल यांच्याकडे ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्यामुळे दोघांच्याही मनात पाल यांच्याविषयी राग होता. या वादातून आरोपींनी पाल यांना मारहाण करून (Khadki) डोक्यात लोखंडी हत्याराने वार केले. ज्यात पाल हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.