Khandala : मंकी पॉईंटवरून दरीत पडलेल्या व्यक्तीस वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन

एमपीसी न्यूजखंडाळा घाटात (Khandala ) मंकी पॉईंट येथून एक व्यक्ती दरीत पडला. ही घटना गुरुवारी (दि. 20) घडली. दरीत पडलेला व्यक्ती जिवंत असून त्याला वाचविण्यासाठी शुक्रवारी (दि. 21) सकाळी रेस्क्यू ऑपरेशन केले जाणार आहे.

Today’s Horoscope 21 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी पुणे मुंबई मार्गावर असलेल्या खंडाळा घाटात एक व्यक्ती दरीमध्ये पडला. दरीमध्ये पडलेला व्यक्ती जिवंत असून त्याला बाहेर काढण्यासाठी शुक्रवारी रेस्क्यू ऑपरेशन राबविले जाणार आहे. त्यासाठी शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ या संस्थांना पाचारण करण्यात आले आहे. दरीत पडलेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी शुक्रवारी सकाळी वरील संस्थांची पथके बचावकार्य (Khandala ) करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.