Khandala : खंडाळा तलावाचे पाणी व परिसर दूषित करणार्‍या दोघांवर लोणावळा नगरपरिषदेकडून गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : खंडाळा तलाव व परिसर दूषित करत तलावातील (Khandala) पाणी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्यास कारणीभूत असलेल्या दोघांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 269, 270, 34 महा. नगरपरिषद व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 294 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने आरोग्य निरीक्षकांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

लोणावळा नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक दत्तात्रय सुतार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश रामा माडे व अनिल विजय जाधव (दोघेही राहणार नेताजीवाडी खंडाळा) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 जानेवारी 2017 पासून 22 जून 2023 दरम्यान हा प्रकार घडला आहे. प्रकाश रामा माडे व अनिल विजय जाधव दोघे राहणार नेताजी वाडी खंडाळा यांनी वराह (डुकरं) पालनाचा व्यवसाय करताना कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता वराह पालन करून ते नेताजी वाडी, खंडाळा, ठाकरवाडी या परिसरात वराह मोकळी सोडून दिली आहेत.

त्यांना परिसरातील हॉटेलमधील उरलेल्या अन्न ते टाकतात. सदरचे अन्न सडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच त्यांची विष्टाही कोणत्याही प्रक्रिया न करता त्यांनी नाल्यात सोडली आहे.

ते पाणी खंडाळा येथील तलावास येऊन मिसळल्याने तलावातील पाणी दूषित होऊन तलावातील जलचर प्राणी तसेच तलावा शेजारी राहणारे नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचे या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

नेताजीवाडी परिसरात राहणार नागरिकांमध्ये धोकादायक रोगाचा (Khandala) संसर्ग पसरण्याची शक्यता निर्माण झाल्याने व तलावातील पाणी दूषित केल्याने वरील दोघांवर सदरचा गुन्हा लोणावळा  नगरपरिषदेकडून दाखल करण्यात आला आहे.

लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मयुर अबनावे या प्रकरणी तपास करत आहेत.

Pune News : आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धांतील राष्ट्रीय विजेत्यांचा संवाद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.