Khandala : शिवदुर्ग रेस्क्यू टीमने खोल दरीत कोसळलेल्या तरुणाची केली सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज-ओरिसा राज्यातील एक तरुण ट्रेकिंग करण्यासाठी (Khandala ) मावळ तालुक्यातील खंडाळा येथे आला होता. मात्र ट्रेकिंग दरम्यान त्याच्यासोबत एक दुर्घटना घडली. अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खोल दरीत पडला. मात्र सुदैवाने तो एका झाडावर जाऊन अडकला. मावळातील शिवदुर्गच्या रेस्क्यू टीमने आणि वन्यजीव मावळ रेस्क्यू टीमने त्याची सुखरूप सुटका केली. हरिश्चंद्र मंडोल असे या तरुणाचे नाव आहे. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण हरिश्चंद्रच्या बाबतीत खरी ठरली.

 

हरिश्चंद्रहा मूळचा ओरिसाचा. ट्रेकिंग करण्यासाठी तो मावळत आला होता. गुरुवारी तो मंकी पॉईंट येथील अंधारमय जंगलातून जात असताना त्याचा पाय घसरला आणि तो खोल दरीत कोसळला. सुदैवाने खोल दरीत असताना एका झाडावर जाऊन तो अडकला. हरिश्चंद्र ज्या रिक्षा मधून या ठिकाणी आला होता त्या रिक्षाच्या चालकाला लगेच फोन करून मदतीची गरज असल्याचे सांगितले.

Pune : भरधाव वेगातील दुचाकी पत्र्याच्या शेडवर आदळल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

रिक्षा चालकांनीही घटनेचं गांभीर्य ओळखून लोणावळा शहर पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमला याची खबर दिली. त्यानंतर तातडीने घटनास्थळी पोलीस आणि शिवदुर्गचे जवान दाखल झाले. त्यानंतर रात्री उशिरा सुरू झाली रेस्क्यू करण्याची मोहीम. रात्री उशिरा वन्यजीव रक्षक मावळ आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत हरिश्चंद्र ला सुखरूप (Khandala )बाहेर काढले.

या मोहीमेत शिवदुर्गचे महेश मसने,सचिन गायकवाड सर,योगेश उंबरे ,सनी कडू,सुरज वरे,योगेश दळवी,आदित्य पिलाने,प्रणय अंबुरे,राहुल दुर्गे,समीर जोशी,हर्ष तोंडे,प्रिन्स बेठा,कपिल दळवी,सिद्धेश निषाळ,हरिश्चंद्र गुंड,मधुर मुंगसे,अशोक उंबरे,अमित गोतरणे,साहिल दळवी,विघ्नेश ढोकळे,आकाश भांगरे,अतिष भांगरे,शुभम काकडे,कौशल दुर्गे,गणेश जाधव,साहील ढमाले,अनिल आंद्रे,गणेश निसाळ,सत्यम सावंत,कुणाल कडु,सागर कुंभार,रितेश कुडतरकर,महादेव भवर,चंद्रकांत बोंबले,आनंद गावडे,अनिल सुतार,गणेश फाळखे,अमोल सुतार,दिलीप गदिया,रतन सिंग,मयूर दळवी,अतुल लाड,मनोहर ढाकोळ,दीपक बोराडे,मयूर निगड,अशोक कुटे,सुनील गायकवाड,गणेश ढोरे,विनय सावंत,विकी दौंडकर,साहील नायर,साहील लांडगे,अनिश गराडे,निलेश संपतराव गराडे यांचा सहभाग होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.