Pune : भरधाव वेगातील दुचाकी पत्र्याच्या शेडवर आदळल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव वेगात धावणारी दुचाकी पत्र्याच्या शेडवर (Pune) जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. मुंढवा ते मगरपट्टा यादरम्यानच्या रस्त्यावर हा अपघात झाला.

भरधाव वेगातील दुचाकी स्पीड ब्रेकवर आदळली आणि चालकाचे नियत्रंण सुटून ती समोरील पत्र्याच्या शेडला धडकली. जोशी रमेश थोरात (वय 21, रा. कॅम्प) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालक तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई तुकाराम झुंजार यांनी तक्रार दिली आहे. हा अपघात 2 एप्रिल रोजी दुपारी घडला होता. याप्रकरणात हडपसर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोदं होती.

Pune : दारूच्या नशेत फोडली सरकारी बस; 19 वर्षीय तरुणाला बेड्या

पोलिसांनी अपघातानंतर प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यानूसार गुन्हा नोंद केला आहे. जोशी हा दुचाकीने मुंढवा येथून मगरपट्टाकडे जाणाऱ्या रोडने येत होता. त्यावेळी स्पीड ब्रेकरवर त्याची दुचाकी आदळळी. त्यात त्याचे दुचाकीवरील नियत्रंण सुटले आणि तो समोरील पत्र्याच्या शेडला जाऊन धडकला. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे चौकशीत समोर आले आहे. पुढील तपास पोलीस करत (Pune) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.