PCMC : महापालिका देणार शहरातील ‘मॉल’ला नोटीस; कारण काय…

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून महापालिकेच्या ( PCMC ) अग्निशमन विभागामार्फत चिंचवडमधील एका मॉलमध्ये घेण्यात आलेल्या मॉकड्रिलनंतर काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे शहरातील 5 मोठ्या मॉलला नोटीसा देण्यात येणार आहेत. तसेच पालिकेने सुचविलेल्या उपाय योजनांची अंमलबजावणी केली की नाही? याची पाहणी करण्यात येणार आहे. मॉकड्रिलनंतर महापालिका इमारतीमध्ये काही महत्वाच्या त्रुटी निदर्शास आल्याने पालिका इमारतीचे फायर ऑडिट करण्यात येणार आहे.

महापालिका कार्यालयामध्ये कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास त्या परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरे जावे याची चाचपणी घेण्यासाठी मॉकड्रिल घेणे आवश्‍यक असते. त्यादृष्टीने पालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये बुधवार (दि.19) फायर मॉकड्रिल घेण्यात आले. इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या अग्निशमन उपकरणांची तसेच आपत्कालीन यंत्रणांची या माध्यमातून चाचपणी घेण्यात आली. मात्र, या मॉकड्रिलमध्ये जवानांच्या शिट्यांपेक्षा आगीच्या सूचनेच्या अलार्मचा आवाज कमी असल्याचे निदर्शास आले, इमारतीमध्ये प्रचंड धूर झाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी खाली येताना आपण कोणत्या मजल्यावर आलो आहोत, हे दिसून येत नव्हते. काही कर्मचारी हे तळ मजल्याकडे जात होते.

Pune : भरधाव वेगातील दुचाकी पत्र्याच्या शेडवर आदळल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

तर इमारतीमध्ये पाऊस, ऊन, वारा येऊन नये म्हणून टेरेसवर लावण्यात आलेल्या डोममुळे धूरच बाहेर पडत नसल्याचे समोर आले. त्यामुळे इमारतीमधील धूर बाहेर जात नसल्याने मोठा धूर झाला होतो. अशा विविध महत्वपूर्ण त्रुटी समोर आल्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला पालिका इमारतीचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले ( PCMC ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.