Khed : रुग्णवाहिका आणि टेम्पोची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, तिघेजण जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या रुग्णवाहिकेची (Khed) एका टेम्पोला समोरासमोर धडक बसली. यामध्ये टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर रुग्णवाहिका चालक आणि रुग्णवाहिकेतील अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (दि. 6) दुपारी चार वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द येथे घडला.

बादल सुरेशराव खडसे (वय 30) असे मृत्यू झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. उमाकांत निळकंठराव जानते (वय 32, रा. वडमुखवाडी, चऱ्होली), हृदयराम अंजोरी केवट (रा. घोरपडी, पुणे) आणि एक महिला असे तिघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी बादल यांच्या बहिणीने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुग्णवाहिका चालक उमाकांत जानते याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Chinchwad : तुमच्या सोन्या-चांदीला योग्य भाव देणारे विश्वासू नाव म्हणजे ॲक्यूरेट गोल्ड अँड सिल्व्हर पर्चेस स्टोअर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ बादल त्याचा टेम्पो (एमएच 14/एचयु 8337) घेऊन आळंदीच्या दिशेने जात होता. त्यावेळी उमाकांत हा त्याच्या ताब्यातील रुग्णवाहिका (एमएच 04/जी 8388) आळंदी ते वडगाव या मार्गाने भरधाव वेगात घेऊन जात होता. उमाकांत याने निष्काळजीपणे रुग्णवाहिका चालवून समोरून येणाऱ्या टेम्पोला समोरून जोरात धडक दिली.

यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुसकान झाले. त्यात टेम्पो चालक बादल याचा (Khed) मृत्यू झाला. तर रुग्णवाहिकेतील तिघेजण जखमी झाले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.