Khed : राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका प्रवक्ता पदी आरिफ शेख यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज : खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती (Khed) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे आयोजन तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांनी खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

Tathawade : माई बाल भवनच्या अंध महिलांनी पुन्हा एकदा फुटबॉल स्पर्धेमध्ये सिद्ध केले वर्चस्व

या कार्यक्रमा मध्ये आळंदी येथील पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी खजिनदार आरिफ शेख यांची खेड तालुका प्रवक्ता पदी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या सुचनेने निवड करण्यात आली. तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, शरद पवार व अजित पवार यांच्यावरील आणि पक्षावरील निष्ठा पाहून त्यांची या पदी नियुक्ती करण्यात येत आहे. आरिफ शेख हे राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या पूर्वी म्हणजे 1999 सालच्या आधी आळंदी शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस होते. शरद पवार यांनी ज्यावेळी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. ते पवार साहेबांबरोबर पक्ष कार्यकर्ते म्हणून सामील झाले.

खेड तालुका प्रवक्ता पदी आरिफ शेख यांची निवड झाल्याबद्दल (Khed) राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून व आळंदीतील मित्रपरिवारातून त्यांना अभिनंदनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खेड येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. वारंवार महापुरुषांबद्दल होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधासाठी, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बदली व्हावी, यासाठी दि. 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या मोर्चा संदर्भात दि.12 रोजी खेड येथे तातडीची मिटिंग आयोजित करण्यात आली होती. याबाबतची माहिती आरिफ शेख यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.