Dehugaon News: बालाघाट युवा मित्र परिवारातर्फे दर्शवेळा अमावास्या साजरी

एमपीसी न्यूज – काळ्या आईच्या (मातीच्या) उपकारातून उतराई होण्याचा (Dehugaon News) कृषी संस्कृतीचा महत्त्वाचा सण म्हणजे वेळ अमावस्या. सोनं पिकवणाऱ्या मातीच्या प्रती असलेली श्रद्धा आणि निष्ठा अशा पद्धतीच्या सणांमधून प्रेरणा मिळते. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात वेळ अमावास्या (यळवस) साजरी केली जाते. परंतु, नोकरीला असल्याने गावी जात नसल्याने मराठवाड्यातील नागरिकांच्या बालाघाट युवा मित्र परिवारातर्फे दर्शवेळा अमावास्या (यळवस) मोठ्या उत्साहात देहू परिसरात साजरी करण्यात आली.

बच्चेकंपनीने झोक्याचा, मिकी माऊसचा आनंद घेतला. तर, महिला मंडळीनी खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या खेळाचा आनंद घेतला. महिलांनी गप्पांच्या मैफिली रंगवल्या. त्यानंतर भाजी, भाकरी, गोड भात, आंबील अशा प्रकारे वन भोजनाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमात उद्योजक महेश डोंगरे, देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अभिमन्यू पवार, चंद्रकांत शेळके, अमृत दरेकर, प्रवीण हंबीर, शरद होळकर यांनी सपत्नीक हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली .

Khed : राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका प्रवक्ता पदी आरिफ शेख यांची नियुक्ती

या कार्यक्रमाचे आयोजन बालाघाट युवा मित्र (Dehugaon News) परिवार पुणे या ग्रुपचे कार्यकर्ते हणमंत ढगे, नितीन बनसोडे, विलासराव बोराडे, संदीप गिरी, दत्ता धोंडगे, बळीराम माळी, प्रमोद ईगे, महादेव कुमठेकर, किरण पवार, दौलत वाकुरे, शिवाजी लाकाळ, गोविंद मजगे, राजीव छिद्रे, सचिन सांगळे, महादेव आदमाने, ज्ञानेश्वर शिंदे, दत्ता भोजणे, धोंडू वाढवणे, हानमंत झील, गजानन तावरे, कैलास लोंढे, कैलास वाघमारे, तेजेश उल्ले, बाळासाहेब टाकेकर, ज्ञानेश्वर जाधव, देविदास रोडे, सिद्धार्थ कदम, प्रकाश राऊत, सुधाकर पवार, भिमा सागावे, संतोष कोरणूळे, सुभाष भुसणे, अतिक सय्यद, ज्ञानेश्वर चव्हाण, बालाजी चव्हाण, महेश अकनगिरे, सचिन टेकले, अशोक शेळके, बाळासाहेब अंबड, विठ्ठल घोरबांड, चामले धम्पाल, बालाघाट युवा मित्र परिवार यांनी अतिशय सुंदर नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.