Khed : गुणवंत विद्यार्थी, मुख्यध्यापक- मुख्याध्यापिका यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज – नक्षञाचं देणं काव्यमंच आणि वर्धिष्णु एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही खेड तालुक्यातील सर्व शाळांमधील प्रथम पाच विद्यार्थी, साठ मुख्यध्यापक- मुख्याध्यापिका यांना सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम राजगुरुनगर येथील आनंदी-आनंद मंगल कार्यालय नुकताच उत्साहात पार पडला.

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन कायदेतज्ञ अ‍ॅड.प्रफुल्ल भुजबळ, पुणे यांच्या हस्ते वृक्षपूजन करुन, झाडाला पाणी घालून पर्यावरण संदेश देत आगळ्या वेगळ्या पध्दतीने करण्यात आले.

  • यावेळी नक्षञाचं देणं काव्यमंचचे राष्टीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे, वर्धिष्णु एज्युकेशन ट्रस्ट अध्यक्ष प्रा.विनोद चौधरी, अ‍ॅड. प्रफुल्ल भुजबळ, जिल्हा परिषद, पुणे सदस्य अतुल देशमुख, खेड नगरपंचायत नगराध्यक्ष शिवाजीराव मांदळे, नगरसेवक संदीप रासकर, राहुल परदेशी, मेजर गजानन सोनवणे, संतोष उबाळे, अमित केळुसकर, संतोष शेटे आदी उपस्थित होते.

करिअर मार्गदर्शन करताना प्रा.विनोद चौधरी म्हणाले की,”या स्पर्धेच्या युगात आपणास टिकण्यासाठी पुर्व नियोजन आवश्यक आहे. कठोर परिश्रमाला पर्याय नाही.विविध करिअरच्या वाटा स्पष्ट करुन योग्य मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता आहे. जेईई व नीट या विषयी सखोल माहीती देऊन, आपण योग्य संधीचा जीवनात फायदा घ्यावा.”

  • प्रास्ताविक प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले. काव्यमंचच्या वीस वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेऊन, सत्कार समारंभाची भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी सर्व खेड तालुक्यातील मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका यांना स्मृतीचिन्ह, गौरवपञ, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थी वर्गास गोल्ड मेडल व आकर्षक सन्मानपञ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक,पालक,विद्यार्थी यांनी मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमास मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षी होणा-या या सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूञसंचालन कैलास दुधाळे यांनी केले. तर, आभार प्रर्दशन संतोष उबाळे यांनी मानले. विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.