Khed News : ‘तू मला का टाळतेस’ अशी विचारणा करत महिलेला लाथाबुक्क्याने आणि झाडूने मारहाण

एमपीसी न्यूज – ‘तू मला का टाळतेस’ अशी विचारणा करत (Khed News) एकाने घरात घुसून महिलेला लाथाबुक्क्याने आणि झाडूने मारहाण केली. ही घटना खेड तालुक्यातील कुरूळी येथे घडली.
प्रल्हाद धोंडीबा रायते (रा. रूपीनगर, निगडी, मुळ – बीड) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिडीत महिलेने म्हाळूंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pune : पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दुचाकींची विक्री वाढली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रायते आणि महिलेची पूर्वीपासून ओळख आहे. 19 मार्च रोजी महिला फ्लॅटमध्ये एकटीच असताना रायते तिच्या घरात घुसला. तू मला इग्नोर का करतेस, अशी विचारणा केली. त्यामुळे महिला घराबाहेर जाऊ
लागली असता रायते याने तिला लाथाबुक्क्याने व झाडूने मारहाण केली. महिलेने आरडाओरडा केला असता मी तुला सोडणार नाही. माझ्या मनात येईल तेव्हा मी तुला मारहाण करणार, अशी धमकी देऊन (Khed News) पसार झाला. फौजदार शिंदे या घटनेचा तपास करत आहेत.