Khed : कंपनीची गोपनीय माहिती प्रतिस्पर्धी कंपनीला पुरविल्याबद्दल कर्मचाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपनीतील कर्मचाऱ्याने (Khed) कंपनीची गोपनीय माहिती प्रतिस्पर्धी कंपनीला पुरवून कंपनीचे नुकसान केले. याबद्दल कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 फेब्रुवारी 2015 ते 20 जून 2023 या कालावधीत खेड तालुक्यातील लुमॅक्स इंडस्ट्रीज कंपनीत घडला.

दिनेश ब्रिजलाल गौतम (वय 55, रा. रावेत, पुणे. मूळ रा. राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी राजेशकुमार सोहनलाल गुप्ता (वय 54) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लुमॅक्स इंडस्ट्रीज कंपनीत कार्यकारी निदेशक पदावर काम करतात. त्यांच्या कंपनीत आरोपी दिनेश गौतम हे देखील काम करत होते.

Pune : दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक ठेवा चारचाकींसाठी राखून

त्यांच्याकडे कंपनीच्या व्यवसायासंबंधित गोपनीय माहिती कंपनीने विश्वासाने सोपवली होती. त्या माहितीचा गैरवापर करून गौतम यांनी गोपनीय माहिती फियाम इंडस्ट्रीज या प्रतिस्पर्धी कंपनीला दिली. यात फिर्यादी यांच्या कंपनीचे मोठे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे (Khed) एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.