Chakan : कंटेनरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने एका (Chakan) दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना 10 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता आंबेठाण रोड येथे घडली.

शाम प्रकाश पाल (रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. याप्रकरणी बाळू नामदेव मातेले (वय 45, रा. आंबेठाण रोड, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Khed : कंपनीची गोपनीय माहिती प्रतिस्पर्धी कंपनीला पुरविल्याबद्दल कर्मचाऱ्यावर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची भाची (वय 19) दुचाकीवरून जात होते. आंबेठाण रोड येथे त्यांच्या दुचाकीला आरोपीने त्याच्या ताब्यातील कंटेनर भरधाव वेगात चालवून धडक दिली. त्यात फिर्यादी यांची भाची खाली पडली. दरम्यान ती कंटेनरच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी होऊन मृत झाली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.