KhelRatna Award : नीरज चोप्रा, मिताली राज, रवी दहिया यांच्यासह 11 जणांची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

एमपीसी न्यूज – ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालेफेकपटू नीरज चोप्रा, रौप्य पदक विजेता कुस्तीपटू रवी दहिया, महिला क्रिकेटपटू मिताली राज, हॉकीपटू पी.श्रीजेश यांच्यासह एकूण 11 जणांची क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीची आज (बुधवारी) याबाबत बैठक झाली.

 

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी
एकूण 11 जणांची शिफारस करण्यात आली असून, 35 जणांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

‘खेलरत्न’ पुरस्काराचे खेळाडू-

नीरज चोप्रा (अ‍ॅथलेटिक्स)
रवी दहिया (कुस्ती)
पी.आर.श्रीजेश (हॉकी)
लोव्हलिना बोरगोहाई (बॉक्सिंग)
सुनील छेत्री (फुटबॉल)
मिताली राज (क्रिकेट)
प्रमोद भगत (बॅडमिंटन)
सुमीत अंतिल (भालाफेक)
अवनी लेखरा (नेमबाजी)
कृष्णा नागर (बॅडमिंटन)
एम नरवाल (नेमबाजी)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.