Khopoli : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दहा गाड्याचा विचित्र अपघात

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली फुडमाॅल जवळील उतारावर दहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कसलीही जिवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास किमी किमी 37 जवळ हा विचित्र अपघात झाला.

खंडाळा बोरघाटातील तीव्र उतारावर वाहनचालकांचा गाडीवरील ताबा सुटल्याने पाच कार, चार ट्रक व टेम्पो अशी दहा वाहने एकमेकावर आदळल्याने हा अपघात झाला. सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास पोलीस यंत्रणा, आयआरबीचे कर्मचारी, अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला करत वाहतूक सुरळीत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.