Pune : सिंहगड पोलीस ठाण्यात राम कदम यांच्या विरुद्ध तक्रार दाखल

एमपीसी न्यूज- घाटकोपर येथे दहीहंडी कार्यक्रमात भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यातर्फे काल ( दि.5) सिंहगड पोलीस ठाण्यात राम कदम यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर येथे पार पडलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सर्वच स्तरातून विरोध दर्शविला जात आहे. ‘मुलीने नकार दिला तरीही तिला पळवून आणण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन ‘ असे विधान दहीहंडी कार्यक्रमात बोलताना राम कदम यांनी केले होते. या वादग्रस्त विधानाबाबत आक्षेप नोंदवून दिवसेंदिवस महिला सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे त्याला राम कदम जबाबदार असतील असेही तक्रारीमध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.