Khopoli Accident : बस अपघात प्रकरणात घडले माणुसकी अन संवेदनशीलतेचे दर्शन

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ( Khopoli Accident) जयंतीनिमित्त पिंपळे गुरव येथे ढोल ताशा वादनाचा कार्यक्रम संपवून मुंबई येथील ढोल ताशा पथक शनिवारी मध्यरात्री पुण्याहून मुंबईकडे निघाले. पहाटेच्या वेळी खोपोली परिसरात घाटामध्ये बसचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा, रेस्क्यू टीम, सामाजिक संस्था यांच्यासह अनेक संवेदनशील व्यक्तींनी घटनास्थळी धाव घेतली. केवळ बघ्याची भूमिका न घेता अनेकांनी मदत कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला. जखमींना रुग्णालयात हलवून त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू झाले. या बचाव कार्यात मदत करून माणुसकी दाखवणाऱ्या संवेदनशील असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार.

शनिवारी पहाटेच्या सुमारास शिंग्रोबाच्या वरील बाजूच्या रस्त्यावरून पहाटे चार वाजता बस दरीत कोसळली. साधारणतः 42 प्रवासी ह्या बस मधून प्रवास करीत होते. पहाटे चार वाजता पोलीस यंत्रणेने खोपोलीतील सर्व सामाजिक संस्थांना कॉल केले. बघता बघता काही वेळात सर्व खोपोलिकर जणू काही आपल्या घरातील माणूस असल्याप्रमाणे तिथे मदतीस धावून आले. प्रथमतः गुरू साठीलकर यांच्या नेतृत्वातील ‘अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी’ या सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी दरीत उतरून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याची सुरुवात केली.

बरोबरच ‘यशवंती हायकर्स’ या संस्थेचे सर्व सदस्य आपल्या संसाधनांसह उपस्थित राहिले. त्यांनी जखमी प्रवाशांना दरीतून रोपच्या सहायाने काढण्यास सुरुवात केली. तसेच शिवदुर्ग लोणावळा ह्या टीमने प्रवाशांना काढण्यास सुरुवात केली.

अपघातग्रस्तांचा मदतीसाठी, यशवंती हायकर्स, शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्था,

आपदा मित्र मावळ, अग्निशमन, देवदूत यंत्रणा, आयआरबी, रायगड पोलीस, महामार्ग पोलीस, इतर सामाजिक संघटना आणि त्यांच्या जोडीला खोपोलीतील नागरिक यांच्या प्रयत्नामुळे ( Khopoli Accident) बचाव कार्य वेगाने झाले. सर्व जण पहाटे चार पासून तिथे काम करत होते. अगदी दुपार झाली तरी ह्या सर्व खोपोलीकरांच्या चेहऱ्यावर तसू भरही दमछाक दिसत नव्हती. खोपोलीतील बहुसंख्य तरुण मदतीसाठी आले. सहज सेवाचे शेखर जांभळे यांनीही मदत कार्यात सहभाग घेतला.

शनिवारी दिवसभर कोणी खोपोलीकर पाणी आणून देत होते. तर कोणी बिस्कीट. ज्याच्या त्याच्या परीने जेवढी होईल तेवढी मदत केली जात होती. बचाव पथके घटनास्थळी काम करत असताना खोपोलीतील काही नागरिक नगरपरिषदेच्या रुग्णालयात जखमी रुग्णांची मदत करीत होते. ज्या जखमींना पुढील उपचारासाठी अन्यत्र हलविण्याची आवश्यकता आहे, त्यांना मुंबईकडील रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था देखील तिथे उपस्थित असलेले नागरिक करीत होते.

शनिवारी दिवसभर कोणीही वैयक्तिक अथवा आपल्या संघटनेचे असे म्हणून काम न करता एकसंघ राहून मदतकार्य केले. बचाव पथकांना जिथे कमतरता भासेल तिथे प्रत्येक जण आपापल्या परीने मदत करीत होता.

यशवंती टीम काम करत असताना भक्ती साठीलकरने हॅण्ड ग्लोव्हज आणून दिले. शेखरने काम करणाऱ्यांचे हात मोकळे नाही म्हणून स्वतःच्या हाताने जेवणाचे घास भरवले. काही पत्रकार मित्र पाणी आणून देत होते. आमदार महेंद्र थोरवे यांनी घटनास्थळी येताना पाण्याचे बॉक्स आणले. यामुळे दमलेल्या बचाव पथकांना उभारी मिळाली.

Pune : पुणे जिल्हा न्यायालयात मध्यस्थी जनजागृती शिबीर संपन्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक जाणीव ( Khopoli Accident) दाखवून तत्परतेने जागेवर येऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला स्वतः मुख्यमंत्री विचारपूस करण्यासाठी आल्याने प्रत्येकाला हायसे वाटले. घाटात होणाऱ्या प्रत्येक अपघाताच्या वेळी खोपोली कर सरोदयतेने आणि तत्परतेने मदतीसाठी धावत असतात. शनिवारी पुन्हा एकदा खोपोलीकरांच्या उदार अंतःकरणाची प्रचिती आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र थोरवे, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, पोलीस उपअधीक्षक संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, तहसीलदार तांबोळी, मुख्याधिकारी अनुप दूरे, पदमाकर गायकवाड, सुनिल गायकवाड, राजेंद्र कडू, महेश मसने, सचिन गायकवाड, योगेश उंबरे, सनी कडू, सुरज वरे, योगेश दळवी, हर्षल चौधरी, आदित्य पिलाने, अजय शेलार, प्रवीण देशमुख, रिकी मते, प्रणय अंबुरे, ओंकार पडवळ, समीर जोशी, शैलश भोसले, संतोष खोसे, रमेश मते, संदीप गायकवाड, कपिल दळवी, दत्ता निपाने, जगन्नाथ गरवड, हरिश्चंद्र गुंड, सागर पाठक, दिनेश पवार, मधुर मुंगसे,

अशोक उंबरे, गणेश रौंदळ, अमित बलकवडे, सदाशिव सोनार, चंद्रकांत गा बंदडे, हनुमंत भोसले, केतन खांडेभरड, अमोल सुतार, कौशल दुर्गे, कमल परदेशी, निलेश गराडे, अनिल आंद्रे, सचिन वाडेकर, सत्यम सावंत, दक्ष काटकर , कुणाल कडु, के एस पिल्ले, सागर कुंभार, गणेश गिद, रितेश कुडतरकर, महादेव भवर, अमित गुरव, संजय पिंगळे, सुनील गायकवाड, संदीप काशिनाथ पाटील यांच्यासह असंख्य लोकांनी ( Khopoli Accident) प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बचाव कार्यात आपले बहुमूल्य योगदान दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.