Thergaon : थेरगाव मध्ये स्कूल बसला आग, जीवितहानी झाली नाही

एमपीसी न्यूज – थेरगाव मधील दगडू पाटील नगर येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या स्कूल बसला आग लागली. ही घटना सोमवारी (दि. 8) सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास (Thergaon) घडली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

 

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी  (दि. 8) सव्वा सात वाजताच्या सुमारास पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाला कुणाल कारकूड यांनी दगडू पाटील नगर थेरगाव येथे स्कूल बसला आग लागल्याची माहिती दिली. त्यानुसार थेरगाव उप अग्निशमन केंद्राचे सीनियर फायरमन मनोज मोरे यांचे पथक घटनास्थळी (Thergaon) दाखल झाले. जवानांनी पाणी मारून बसची आग विझवली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र बसचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

Gold price : सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सोने 75 हजार प्रति तोळा होण्याची शक्यता

कस्पटे वस्तीमध्ये गवताला आग
कस्पटे वस्ती, वाकड येथे गवताला आग लागली. ही घटना सोमवारी (दि. 8) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. अजय कस्पटे यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. थेरगाव उप अग्निशमन केंद्र आणि मुख्य अग्निशमन केंद्रातील दोन पथकांनी ही आग विझवली. सीनियर फायरमन मनोज मोरे, लिडींग फायरमन विकास नाईक आणि इतर 16 कर्मचारी आगीच्या ठिकाणी हजर होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.