New Delhi : शेतमालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी कृषी मंत्रालयाचे ‘किसान रथ’ मोबाइल अ‍ॅप लाॅन्च

एमपीसी न्यूज – शेती उत्पादनांच्या वाहतुकीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वाहतूक साधनांची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी ‘किसान रथ’ अॅप तयार करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना उपयुक्त असणाऱ्या या मोबाईल अ‍ॅॅॅॅपची निर्मिती राष्ट्रीय माहिती केंद्र यांनी  केली आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने अन्नधान्य तृणधान्य, भरडधान्ये, कडधान्ये तसेच फळे व भाजीपाला, तेलबिया, मसाले, तंतुमय पिके, फुले, बांबू, लवंग आणि किरकोळ वनोत्पादन, नारळ या सारख्या विविध गोष्टींच्या सुलभ वाहतुकीसाठी हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या अ‍ॅपवर नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी शीतगृह सुविधेद्वारे व्यापाऱ्यांना मदत होणार आहे. कृषी आणि बागायती उत्पादनाच्या प्राथमिक आणि दुय्यम स्तरावरील वाहतुकीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वाहतूक साधनांची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

या माध्यमातून शेतातून बाजारापर्यंत, शेतकरी उत्पादक संस्था संकलन केंद्रापर्यंत आणि गोदामापर्यंत शेतमालाची वाहतूक ही प्राथमिक वाहतुकीत समाविष्ट आहे. द्वितीय स्तरावरील वाहतुकीत बाजारातून शेतमालाची राज्यांतर्गत किंवा आंतरराज्यातील बाजारपेठेत, प्रक्रिया केंद्रात, रेल्वे स्थानकात, गोदामात आणि घाऊक व्यापाऱ्यांकडे वाहतूक करणे अभिप्रेत आहे.

गुगल प्ले स्टोरमधून किसान रथ हे अ‍ॅपप्लिकेशन डाऊनलोड करा. डाऊनलोड केल्यानंतर स्वतःचे नाव, मोबाइल नंबर, आधार नंबर यासारखी माहिती भरण्यासोबत पीएम किसानसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. जर आपण व्यापारी असाल तर आपल्या कंपनीचे नाव, स्वतःचे नाव, मोबाइल नंबरसह नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आणि एक पासवर्ड च्या माध्यमातून लॉगिन करा. किसान रथ इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, पंजाबी, तमिळ, कन्नड आणि तेलुगु या भाषेत उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.