Kranti foundation : क्रांती फाउंडेशन च्या वतीने चिंचवड येथे किल्ले बनवा स्पर्धा

एमपीसी न्यूज : क्रांती फाउंडेशन च्या वतीने मोहन नगर चिंचवड येथे किल्ले बनवा स्पर्धा, पोवाडा स्पर्धा व रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धा व त्याचे बक्षिस वितरण करण्यात आले. छोटे किल्लेदार मावळ्यांसाठी “किल्ले स्पर्धा” आयोजित करण्यात आली होते. (Kranti foundation) यामध्ये अनेक स्पर्धकांनी भाग घेतला. यामध्ये सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मान चिंन्ह देउन त्यांना गौरवन्यात आले.

स्पर्धेतील प्रथम 5 विजेत्यांना सन्मानचिन्ह देउन सन्मानीत करण्यात आले.आणि सर्व सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले.स्पर्धेमध्ये 1) प्रथम क्रमांक { रायगड} छत्रपती शिवाजी मंडळ- मोहननगर 2)कु.सौरभ सोंडकर-काळभोर नगर वितीय क्रमांक { जंजिरा } 3)जय भवानी अपार्टमेंट -महावीर पार्क -तृतीय क्रमांक { राजगड} 4) चतुर्थ क्रमांक { सिंधुदुर्ग } कु.यश शेळके मोहननगर, 5) पाचवा क्रमांक { पन्हाळगड } कु.भार्गव चौधरी मोहननगर या स्पर्धकांना पटकावले तसेच कु.प्रणीत नामदे या स्पर्धकांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकाविले सर्व स्पर्धकांनी अतिशय सुंदर असे किल्ले बनवले होते आणि किल्ल्यांची माहितीही सुंदर दिली.

Dahivali Kirtan : दहिवली येथे कीर्तनकाराच्या ‘त्या’ निर्णयाने जिंकली मने, कीर्तनाचे मानधन भेट म्हणून दिले

तसेच रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक-सौ.पुजाताई बोरकर , द्वितीय क्रमांक -श्रुतीताई पवार, तृतीय क्रमांक -शिल्पाताई धुलप, चतुर्थ क्रमांक-सायलीताई शेवाळे आणि पोवाडा स्पर्धेत बालशाहिर यांनी छत्रपति शिवाजी महाराज यांचा पोवाडा सादर केला या स्पर्धेत -प्रथम क्रमांक- श्रीकांत कलागते, द्वितीय क्रमांक – साहिल नामदे यांना मिळाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.