Pimpri : शिवशाही व्यापारी संघाच्या उल्हासनगर विभाग प्रमुखपदी कृष्णा गायकवाड

एमपीसी न्यूज – शिवशाही व्यापारीसंघ महाराष्ट्र राज्यच्या उल्हासनगर विभाग क्रमांक २ महात्मा गांधीनगर विभागाच्या विभाग प्रमुखपदी कृष्णा अभिमान गायकवाड यांची निवड करण्यात आली. शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेशअध्यक्ष युवराज दाखले यांनी पिंपरी चिंचवड शहर या ठिकाणी निवडीचे पञ दिले.

यावेळी प्रदेश सचिव गणेश आहेर यांनी नवनियुक्त विभागप्रमुख कृष्णा गायकवाड यांना शिवशाही व्यापारीसंघ उल्लासनगरमध्ये वाढविण्याच्या संदर्भात तसेच व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रत्नशील राहण्याच्या सूचना देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील, दत्ता क्षीरसागर, बाळासाहेब गायकवाड, मारूती मस्के आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.