Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची खो- खो स्पर्धेत बाजी

एमपीसी न्यूज – तालुका स्तरीय खो खो स्पर्धेत तळेगाव (Talegaon Dabhade) विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. 17 वर्ष वयोगटातील मुलांनी पहिला, तसेच 17 वर्षाखालील मुलींच्या संघानेही प्रथम क्रमांक मिळवला. 14 वर्ष वयोगटाखालील मुलांच्या गटाने या स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले.

Pimpri : ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग झाला मोकळा; राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा

पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय आणि सिद्धांत इंटर नॅशनल स्कूल यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या मावळ तालुका स्तरीय खो खो स्पर्धेत तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या स्पर्धा सिद्धांत इंटर नॅशनल इन्स्टिट्यूट (सुदुंबरे, मावळ, पुणे) येथे पार पडल्या.

14, 17 व 19 वर्ष वयोगटाखालील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत एकूण 200 संघांनी सहभाग घेतला होता.
17 वर्ष वयोगटा खालील गटात मुलांनी खो- खो स्पर्धेत तुळजाभवानी या संघावर मात करून कृष्णराव भेगडे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम स्थान पटकाविले, तर 17 वर्षे खालील गटातील खो -खो स्पर्धेत मुलींनीही तुळजाभवानी संघाला पराभूत करून प्रथम क्रमांक मिळवून बाजी मारली. 14 वर्ष वयोगटाखालील मुलांच्या गटाने या स्पर्धेत दुसरे स्थान पटकाविले. यावेळी विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी शाळेच्या शिक्षिका सौ. अश्विनी काळे उपस्थित होत्या.

या स्पर्धेसाठी शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन आंद्रे व क्रीडा शिक्षिका सुवर्णा झणझणे यांनी विद्यार्थ्यांकडून या स्पर्धेसाठी सातत्याने सराव करून घेतला. स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल शाळेचे क्रीडा शिक्षक व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, अध्यक्ष संदीप काकडे, खजिनदार गौरी काकडे व शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर व शाळेच्या सर्व शिक्षकांनी कौतुक व अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.