BNR-HDR-TOP-Mobile

Kudalwadi : स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांचे पक्षीप्रेम; पक्षांसाठी अन्न, पाण्याची केली सोय

एमपीसी न्यूज – शहरात उन्हाचा तडाखा वाढल्याने आणि पावसाला अजून बराच अवकाश असल्याने भरदुपारी बाहेर पडण्यास अनेकजण टाळतात. मात्र, पक्षांचे काय? त्यांना उन असो की पाऊस पाणी आणि अन्नासाठी भर उन्हातही त्याच्या शोधार्थ भटकावे लागते. त्यातच यंदाचा उन्हाळा फारच कडक आहे. पक्षांना पाणी आणि अन्नासाठी फार वणवण करावी लागते.

परंतू, निसर्गप्रेमी मात्र अशा कडक उन्हातही पशु-पक्षांच्या हितासाठी झटत असतो. असेच एक निसर्गप्रेमी दिनेश यादव यांनी सांगितले की, पक्षांसाठी अन्न, पाणी देण्याचा प्रयत्न चालवला आहे. पाण्याच्या वाट्या आणि पक्षांचे अन्न उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून कडक उन्हात पक्षांना त्याचा उपयोग होईल.

  • आमच्या गोठ्यावर एक टेबल आहे. त्यावर एक पातीले भरुन पक्षांसाठी पाणी ठेवलेले आहे. पक्षी जेव्हा ताण लागेल तेव्हा तेथे येऊन पाणी पितात. त्यांना पाणी पिताना पाहुन मन प्रसन्न होते. कारण त्यांनाही जगण्यासाठी पाणी हवच ना.. तुम्हीही नक्की हे करा.आपल्या घरावर किंवा टेरेसवर, जमेल तेथे पक्षासाठी पाण्याची सोय करा. हे करण्यासाठी आपला थोडा वेळ जाईल. पण, त्यामुळे एखाद्या पक्षाचे प्राण वाचतील.
HB_POST_END_FTR-A2