Pimpari Chichwad : दैनिक जनशक्ती व लेवाशक्तीचे संपादक कुंदन ढाके यांचे आज सकाळी निधन

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड व पुण्यात लोकमान्य पावलेले दैनिक जनशक्ती व दैनिक लेवाशक्ती चे संपादक व सिद्धिविनायक ग्रुप चे संचालक कुंदन दत्तात्रय ढाके(वय 42 वर्षे) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचा अंतविधी त्यांच्या मूळगावी होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या कुंदन ढाके यांनी पुण्यात बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय काम आहे.भाजप मधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेणारे एकनाथ खडसे यांचे जवळचे सहकारी म्हणून ही त्यांची ओळख आहे.

जळगांव येथील प्रसिद्ध दैनिक जनशक्ती हे त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात सुरू केले.एक दर्जेदार दैनिक कसे असावे याचे त्यांनी उदाहरण दाखवून दिले.त्यानंतर दैनिक लेवाशक्ती हेही दैनिक सुरू केले.

 कुंदन दत्तात्रय ढाके आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांना चक्कर आली. वायसीएम रुग्णालयात नेले असता मृत घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.