NCP : कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी घेतली शरद पवारांची भेट

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मुंबई येथे भेट घेतली. सध्याच्या राजकीय परिस्थितीसोबतच कामगार,कष्टकरी, शेतकरी, बेरोजगारी या विषयावर चर्चा केली.

Bhosri : एटीएम फोडण्याचा प्रयत्न प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

सत्तेसाठी पक्षामध्ये ओढाताण सुरू असताना पवार साहेबांचे पुरोगामी विचार आणि सर्वसमावेशक धोरण, आणि प्रांत अध्यक्ष जयंत पाटील यांचे संघटन कौशल्य व परिवार संवाद यात्रा महत्त्वाच्या वाटतात अशावेळी “निष्ठावंत” म्हणुन पवार साहेबांसोबत असणे गरजेचे वाटते.

याच पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेतल्याचे नखाते यांनी सांगितले. कामगारांना भेडसावत असणारे विविध प्रश्न व करत असलेले कार्य याचा संग्रहित कार्य अहवाल यावेळी साहेबांना भेट दिला. त्यावेळी सध्या कामगार चळवळीची गरज असून ती प्रखरतेने सुरू ठेवा असा सल्ला पवार यांनी दिलयाचेही नखाते यांनी सांगितले.

कामगार विरोधी कायदे, शेतकरी विरोधी कायदे तसेच महागाई बेरोजगारी, महाराष्ट्रातून गेलेले प्रकल्प, महागाई निर्देशांक, असंघटित कामगारांच्या व्यथा यावरून झालेली आंदोलने, याबाबत प्रामुख्याने आढावा अहवालात घेण्यात आलेला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.