Chakan : चाकणमध्ये भूमाफियांचा गुंडाराज; नागरिकांना सोडावे लागणार कष्टाच्या जागेवर पाणी

एमपीसी न्यूज : चाकण औद्योगिक परिसरात गेल्या (Chakan) काही वर्षांत थंड बस्त्यात गेलेल्या भूखंड माफियांनी पुन्हा फणा उगारला आहे. शासकीय यंत्रांना हाताशी धरून आणि भक्कम राजकीय दबावाने अशा मंडळींनी बिनधास्त जमिनींचे ताबे घेण्याचा सपाटा लावला आहे. चाकण औद्योगिक भागातील भांबोली (ता. खेड ) येथे दडपशाही करून जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची बाब रविवारी (दि. 15 ) समोर आली. सर्वसामान्य नागरिक मात्र यामुळे त्रस्त झाले असून प्रचंड दबाव तंत्रामुळे आयुष्यभर सांभाळलेल्या जमिनीच्या तुकड्यांवर पाणी सोडण्याची वेळ अनेकांवर आली आहे.

चाकण औद्योगिक भागात जमिनींना सोन्यापेक्षाही जास्त भाव आल्यामुळे भूखंड माफियांची नेहमीच मोक्याच्या जागांवर वक्रदृष्टी राहिली आहे. राजकीय पाठबळ असलेल्यांनी भूखंड माफियांच्या मदतीने जागा बळकावण्याचे सत्र सुरू केल्याचे प्रकार नवीन राहिलेले नाहीत. जागा बळकावण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सांभाळली जाते. त्यामुळे अशा अन्यायाच्या संदर्भात त्यांच्याकडे तक्रार नेली तरी सामान्य नागरिकांची तक्रार धुडकावून लावली जाते. चाकणसह तालुक्याच्या सर्व भागात गेल्या काही वर्षांत बडे राजकारणी तसेच विकासक व बिल्डर्स यांचे पाठीराखे जमीन जुमल्याचे व्यवहार अथवा बेकायादेशीर बाबी नियमित करण्यात गर्क असूनही सरकार दरबारची (Chakan) मुख्य राजकीय उलाढाल आहे.

Alandi : आळंदीत धर्मांतरण सुरूच; 14 जणांवर गुन्हा दाखल

औद्योगिक भागातील जमीन व्यवहार, वादातील जमिनींचे ताबे यातून वर्षाला कोट्यावधी रुपयांची उलाढाल यंत्रणा हाताशी धरून केली जात आहे. बळाचा वापर करून जमीन मालाकातील एकाला हाताशी धरून अन्य सर्व मूळ मालकांना दमबाजी करून त्रास देऊन भांबोली मध्ये अशाच प्रकारे भाडोत्री गुंडांनी जमिनींचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. आता या मंडळींचे पाठीराखे कोण? हे सर्वश्रुत असले तरी त्यांच्या विरोधात बोलण्याचे कुणीही धाडस करत नसल्याची स्थिती आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.