Pimpri : परवाना धारक 290 पिस्तूल जमा

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवाना घेऊन पिस्तूल बाळगणार्‍या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील राजकीय व्यक्तींसह आदी नागरिकांना पोलिसांकडून नोटीस देण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार शनिवारपर्यंत 290 जणांनी पिस्तूल जमा केले आहे. दरम्यान, शहरात एक हजार 26 परवाना धारक पिस्तूल आहेत.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 21 सप्टेंबरपासून लागू करण्यात आली. त्यामुळे परवाना धारक पिस्तूल जमा करण्याचे काम सुरु आहे. नोटीस दिल्यापासून संबंधितांनी सात दिवसांच्या आत पिस्तूल पोलिसांकडे जमा करणे गरजेचे आहे. शनिवारपर्यंत 290 जणांनी पिस्तूल जमा केले आहे.

विधानसभा निवडणुकीत काही गैरप्रकार होऊ नये, पैशांचे वाटप होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात 12 चेकपोस्ट असणार आहेत. यामध्ये पुणे-नशिक महामार्गावर तळेगाव चौक, शिक्रापूर चाकण रोडवर एच. पी. चौक, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भक्ती-शक्ती चौक, सोमाटणे फाटा, भोसरी आळंदी रोडवर बनाचा ओढा, पुणे नाशिक महामार्गावर मोशी टोलनाका, बंगलोर-मुंबई महामार्गावर किवळे फाटा, वाकड पुल, चांदणी चौक, उर्से टोलनाका, रावेत औंध रोडवर डांगे चौक, आळंदी लोणीकंद रोडवर मरकळ फाटा अशा 12 ठिकाणी चेकपोस्ट उद्या (रविवार) पासून कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.