Pune News : लोहगाव विमानतळ एप्रिल-मे महिन्यात 15 दिवस बंद राहणार !

एमपीसी न्यूज : येत्या 26 एप्रिल ते 9 मे दरम्यान 14 दिवसांकरीता पुणे लोहगाव विमानतळ पुर्णत: बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संरक्षण खात्याच्या अखत्यारीत लोहगाव येथील पुणे विमानतळ येते. त्यामुळे धावपट्टीसह अन्य देखभाल दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे येत्या 26 एप्रिल ते 9 मे दरम्यान तब्बल 14 दिवस प्रवासी आणि कार्गो विमानांचे उड्डाण बंद ठेवण्यात येणार आहे.

भारतीय हवाई दलाकडून Indian Air Force IAF) विमानतळावरील खराब झालेल्या धावपट्ट्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या 26 ऑक्टोबरपासून रात्री 8 सकाळी 8 वाजेपर्यंत विमानतळावरील देखभाल दुरूस्तीचे काम केले जात आहे. त्यापैकी पुढच्या टप्प्यात धावपट्ट्यांच्या दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे 2 आठवडे सर्व विमानांची वाहतूक बंद ठेवण्याबद्दलचे ट्विट पुणे विमानतळाच्या अधिकृत हँडलवरून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.