Lonavala : द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; चालक जखमी

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर भरधाव कंटेनरची तीन वाहनांना धडक बसून झालेल्या अपघातात एक चालक जखमी झाला असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास किमी 45/700 जवळ हा अपघात झाला.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेल्या एका कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने समोर जाणार्‍या इनोव्हा गाडीला धडक दिली, इनोव्हा गाडीने समोरून जाणार्‍या बीएमडब्लू कारला धडक दिली. त्यानंतर या कंटेनरने आणखी एका कंटेनरला धडकला. यामध्ये कंटेनरचा चालक काही काळ गाडीत अडकला होता.

अपघाताची माहिती समजताच खंडाळा महामार्गचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, आयआरबी व देवदूत पथक यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला गाडीतून बाहेर काढले. अपघातग्रस्त वाहने बाजुला करत वाहतूक सुरु केली. अपघातामुळे काहीकाळ मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.