Wagholi : मद्यधुंद दुचाकीस्वाराची दुसऱ्या दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मद्यधुंद दुचाकीस्वाराने समोरून येणाऱ्या ( Wagholi) दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना नगर रस्त्यावर वाघोली येथे घडली.

Pune : ससून रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाकडून लाच घेणाऱ्या लिफ्टमनला रंगेहात अटक

राहुल मोहन डुकळे (वय 19 रा. गायरान गोरेवस्ती, वाघोली) आणि रावसाहेब सिद्धाजी माने (वय 21, रा. लोणीकंद) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस कर्मचारी अमोल बबन गिरमे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मृत दुचाकीस्वार राहुल डुकळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार राहुल डुकळे त्याच्या मित्रासह वाघोली येथील भावडी रस्त्यावरून सोमवारी रात्री दहाच्या सुमारास जात होता. या वेळी भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या डिलिव्हरी बॉय रावसाहेब मानेला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणासह तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान डुकळे आणि माने या दोघांचा ( Wagholi) मृत्यू झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.