BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : बाळासाहेब जाधव यांचा स्विकृत सदस्य पदाचा राजीनामा; 17 तारखेला नवीन सदस्याची होणार निवड

एमपीसी न्यूज – लोणावळा नगरपरिषदेमधील भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत सदस्य जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब जाधव यांनी त्यांच्या पदाचा नुकताच राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर मंगळवारी (दि.17 सप्टेंबर रोजी) नवीन सदस्याची निवड करण्यात येणार आहे.

लोणावळा नगरपरिषदेच्या कार्यालयात संपन्न होणाऱ्या या निवड प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा सुरेखा जाधव या काम पाहणार आहे. 16 तारखेला या पदासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्यात येणार असून 17 तारखेला दुपारी दोन वाजता निवड झालेल्या नवनियुक्त सदस्याचे नाव पीठासीन अधिकारी जाहीर करणार आहे.

राजीनामा दिलेले बाळासाहेब जाधव यांची अडीच वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली होती. स्विकृत सदस्य पदाकरिता अनेक जण इच्छूक असल्याने रिक्त झालेल्या जागेवर आता कोणाची वर्णी लागणार हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

.