Dehuroad News : राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका उपाध्यक्षपदी बाळासाहेब जाधव

एमपीसीन्यूज : चिंचोली, देहूरोड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे मावळ तालुका अध्यक्ष बबन भेगडे यांनी जाधव यांची नियुक्ती केली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते जाधव यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

जाधव यांनी या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळी आहे. पक्षाच्या विविध कार्यक्रमांसह आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड, मावळ विधानसभा आणि लोकसभा तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी एकनिष्ठेने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची पोहोच पावती म्हणून त्यांची मावळ तालुका उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

पदाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार तळागाळात रुजविण्यासाठी प्रयत्न केले जातील. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे आणि सूचनांचे पालन करून मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी बळकट करण्यावर भर देणार असल्याचे जाधव यांनी निवडीनंतर सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.