BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या एकलेर्क्स कंपनीला संपर्क भूषण पुरस्कार

एमपीसी न्यूज – संपर्क बालग्राम संस्था मळवली येथे गरीब, अनाथ, आदिवासी मुलांना आणि आदिवासी कुटुंबाला संपर्क संस्थेच्या माध्यमातून सहकार्य करणाऱ्या एकलेर्क्स कंपनीला संपर्क भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संपर्क संस्थेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संपर्क संस्था ही मागील 29 वर्षांपासून अनाथ निराधार व मुळशी, मावळ तालुक्यात गरीब आदिवासी व गरजू लोकांसाठी काम करत आहे. संपर्क गेली पाच ते सहा वर्षांपासून आदिवासी बांधवाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प मुळशी तालुक्यातील एकूण 54 गावात राबवत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, उपजीविका, कागदपत्रे, शासकीय योजना, आरोग्य, व्यासन मुक्ती या विषयाला घेऊन काम करत आहे.

  • दरवर्षीप्रमाणे यंदा मुळशी तालुक्यातील 600 आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये शाळेतील सर्व आदिवासी मुलांना रेनकोट, दप्तरे, वह्या, चित्रकला, उजळणी पुस्तक, वही, रंगपेटी, कंपासपेटी हे साहित्य वाटप केले आहे. त्याचा परिणाम त्यांची शाळा गळती थांबवण्यासाठी झाला. तसेच 382 आदिवासी कुटुंबाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्याचे स्थलांतर थांबवण्यासाठी रोजगार देण्यात आले आहेत. कातकरी बांधवांनी सुद्धा आपले मत मांडले आणि संपर्क संस्थेचे आभार मानले.

कार्यक्रमासाठी एकलेर्क्स कंपनीचे बिरेंन गाभावाला, दीपा कपूर, अनिष्ट घोषाल, अमितजी, चिंतन सिरिया तसेच संपर्क संस्थेचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी, विश्वस्त मुकुंद भोळे, नारायण जोशी तसेच मुख्यध्यापक चालक, परेश खाडिलकर, प्रदीप वाडेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमितकुमार बँनर्जी यांनी तर,सूत्रसंचालन निलेश कदम यांनी केले.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3