Lonavala : इंद्रायणी नदी स्वच्छता मोहिमेत गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे श्रमदान

एमपीसी न्यूज – नमामी इंद्रायणी (चंद्रभागा) स्वच्छता, खोलीकरण आणि रुंदीकरण मोहिमेत आज तुंगार्ली येथिल गुरुकुल विद्यालयाने उत्सपुर्तपणे सहभाग घेतला. शाळचे 250 विद्यार्थी व शिक्षक यांनी आज इंद्रायणी नदीच्या सफाई कामात सहभाग घेत नदीपात्रातून गाळासोबत काढलेले दगड पिचिंग कामासाठी गोळा केले.

लोणावळा नगरपरिषद, मावळ प्रबोधनी व मावळ वार्ता फाऊंडेशन यांच्या वतीने मागील दीड महिन्यापासून लोणावळा शहरातून उगम पावणार्‍या इंद्रायणी नदीच्या पात्रातील जलपर्णी व गाळ काढणे, नदी पात्राला अडथळा ठरणारे पात्रातील दगड काढणे, पात्राच्या बाजुने दगडी पिचिंग करणे ही कामे सुरु करण्यात आली आहे.

  • नदीपात्र स्वच्छतेच्या मोहिमेत शहरातील नागरिक, शाळा, विविध सामाजिक संघटना यांनी सहभाग घेण्याचे असे आवाहन करण्यात आले होते. दोन दिवसांपुर्वी नगरपरिषदेत शहरातील सर्व संघटनांची एकत्रित बैठक घेण्यात आली होती.

या आवाहानाला सकारात्मक प्रतिसाद देत गुरुकुल विद्यालय‍ाच्या 250 विद्यार्थी आणि शिक्षकांनी आज नदीपात्रावर श्रमदान केले. त्यांच्यासोबत मावळ प्रबोधनीचे संस्थापक रविंद्र भेगडे, मावळ वार्ता फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र टेलर, किरण गायकवाड, राजेंद्र चौहान, विनय विद्वांस, बाळासाहेब फाटक, ज्ञानेश्वर येवले, भरत तिखे, संदीप वर्तक, नविन भुरट, बापुलाल तारे, सुनिल तावरे, विनित भेगडे, संजय फाटक आदी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.