Lonavala : काँग्रेसच्या महाराष्ट्र सचिवपदी नारायण आंबेकर

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी लोणावळा शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नारायण आंबेकर यांची निवड करण्यात आली आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी आंबेकर यांची नियुक्ती जाहीर केली.

आंबेकर यांनी पाच वर्ष लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांच्या कार्यकाळात दोन वेळा लोणावळा नगरपरिषदेत काँग्रेसची सत्ता आली होती. पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत संघटना बळकटीवर भर देणार असल्याचे आंबेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.