Pune : गोडीजी सेवा प्रतिष्ठान तर्फे पूरग्रस्तांना स्वच्छता किटचे वाटप

एमपीसी न्यूज- गोडीजी सेवा प्रतिष्ठानतर्फे दांडेकर पूल झोपडपट्टी मधील पूरग्रस्तांना शुक्रवारी (दि.27) स्वच्छता किटचे वाटप तसेच अन्नदान करण्यात आले.

बुधवारी (दि. 25) झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबील ओढ्याला आलेल्या पुरात दांडेकर पूल झोपडपट्टी मधील अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले. अनेक घरातील सामान पुराच्या पाण्यात वाहून गेले.

येथील पूरग्रस्त नागरिकांना मदत म्हणून 500 बादल्या आणि 500 फिनेल बाटल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच येथील 3000 रहिवाशांना दोन दिवस अन्नदान करण्यात आले.

या उपक्रमासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल झवेरी, नयन शहा, मनोज शहा, पियुष शहा, अभिजित शहा, नेहल शहा, अमित शहा, हितेश शहा, दिजेश शहा, देवेंद्र शहा, भावेश शहा, राहुल गांधी, स्वाती शहा, रोहन शहा, राहुल शहा आणि संगीता रिसबूड यांनी विशेष परिश्रम घेतले.

गोडीजी सेवा प्रतिष्ठानतर्फे अलीकडेच सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील 8 गावांना तीन ट्रक भरून स्वछता किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये स्वच्छता उपयोगाच्या 19 वस्तू होत्या. प्रतिष्ठान तर्फे मागील आठ वर्षांपासून शिक्षण, आरोग्य विषयक उपक्रम राबविले जातात. तसेच ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारची मदत केली जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.