Lonavala News : खंडाळा महामार्ग पोलिसांकडून वाहन चालकांना मास्क व फेस शिल्डचे वाटप

0

एमपीसीन्यूज : कोरोना महामाराचा प्रसार रोखण्यासाठी चेहर्‍यावर मास्क अथवा फेस शिल्ड लावणे महत्वाचे असताना देखील काही वाहनचालक मास्क लावत नसल्याने खंडाळा महामार्ग पोलिसांनी द्रुतगती मार्गावरील कुसगाव टोलनाका, उर्से टोलनाका तसेच खंडाळा टँप याठिकाणी वाहनचालकांना मास्कचे वाटप केले.

मागील सात महिन्यांपासून संपुर्ण देश व राज्य कोरोना या महामारीचा सामना करत आहे. कोरोनाचे विषाणू हे शिंका आणि तोंडातून बाहेर पडणार्‍या तुषारांमधून संक्रमित होत असल्याने नागरिकांनी चेहर्‍यावर मास्क लावण्याच्या सूचना केंद्र व राज्य शासनाने दिल्या आहे.

सध्या सर्वत्र अनलाॅक होत असल्याने मार्गावर वाहनांची तर शहरांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे.

शासन वारंवार सूचना देत असताना देखील काही वाहनचालक मास्क लावत नाहीत, काहीजण तोंडावर रुमाल अथवा टाॅवेल गुंडाळतात अशा चालकांची वाहने थांबवून खंडाळा महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले, पोलीस उपनिरीक्षक कांबळे व त्यांचे कर्मचारी मास्क वाटप करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.