Lonavala : शिवदुर्ग क्लायंबिंग टिमच्या चार बाल मावळ्यांनी सर केला नागफणीचा 350 फुटांचा सुळका

एमपीसी न्यूज- शिवदुर्ग मित्र क्लायंबिंग टिमच्या चार लहान मुलांनी रोमहर्षक कामगिरी करत नागफणीचा 350 फुट उंचीचा सुळका यशस्वीरित्या पार केला.

हर्ष तोंडे (वय 16), अदित्य पिलाने (वय 13) रितेश कुडतरकर (वय 15 ) आयुष वर्तक (वय 11) यांनी अतिशय कमी वयात ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. गिर्यारोहकांकरिता आव्हानात्मक असलेला हा सुळका नियोजनबध्द चढाई करत ह्या बाल मावळ्यांनी सर केल्याने सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शिवदुर्गचे गिर्यारोहक गणेश गीध, रोहित वर्तक, समीर जोशी, ओंकार पडवळ, योगश उंबरे, सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली.
चढाई दरम्यान चारही बाल मावळ्यांना सपोर्टर म्हणून सनी कडू, राजेंद्र कडू, अंकुश महाडीक, प्रवीण ढोकळे, ओम हरसुले, समर्थ जरांडे, प्रिन्स बैठा, वैष्णवी भांगरे, प्रणय अंबुरे यांनी काम पहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.