Lonavala : अति दुर्गम आदिवासी भागात असलेल्या कळकराई गावातील शाळेस संगणक भेट

एमपीसी न्यूज- गड भटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम कळकराई गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता संस्थेच्या वतीने संगणक भेट देण्यात आला. अतिदुर्गम भागात पायी जाऊन या कार्यकर्त्यांनी हे काम केल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

अत्यंत दुर्गम भागात दरीच्या मधल्या सपाट जागेत 20 ते 25 उंब-याचे कळकराई गाव आहे. या गावात जाण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी ओबड धोबड दगडातुन जंगलातील दोन तासांचा प्रवास करून कळकराई गावात पोहोचले. या गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संगणक देण्यात आला. या भेटीमुळे येथील विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. या सर्वानी दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. सुहास कदम यांनी हा संगणक उपलब्ध दिला.

सदर कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी अक्षय औताडे, किरण चिमटे, दत्तात्रय करपे, अमोल मेहरकर, केंद्रप्रमुख सुनील माकर, मुख्याध्यापक गंगाराम केदार, शिक्षक विठ्ठल पुल्लेवाड, ग्रामस्थ धर्मा तळपे, सखाराम लाडके उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.