BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : शिवदुर्गच्या पाच खेळाडूंची राष्ट्रीय पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेकरिता निवड

राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेत 3 सुवर्ण 2 रौप्य पदके

0

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबई व महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या सबज्युनिअर, ज्युनिअर, सिनियर व मास्टर्स पुरुष आणि महिला राज्यस्तरीय बेंचप्रेस अजिंक्यपद स्पर्धेत लोणावळ्यातील शिवदुर्ग फिटनेसला तीन सुवर्ण व दोन रौप्य पदके मिळाली.

राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसचा तुषार कालेकर (53 किलो सबज्युनियर सुवर्ण पदक), गौरव विकारी (83 किलो सबज्युनियर सुवर्ण पदक), चंद्रकांत होले (105 किलो सिनियर रौप्य पदक), अशोक मते (74 किलो मास्टर्स रौप्य पदक), ज्योती कंधारे (52 किलो सिनियर सुवर्ण पदक) यांनी पदके मिळवली.

या पाचही खेळाडूंची दिल्ली येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली असल्याची माहिती शिवदुर्गचे अध्यक्ष व फिटनेस क्लबचे कोच अशोक मते यांनी दिली.

HB_POST_END_FTR-A2

.