BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : सिंहगडच्या एन बी नवले कॉलेजला नॅकची ‘ब’ श्रेणी

418
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- लोणावळा येथील सिंहगड एज्युकेशन ट्रस्टच्या एन बी नवले कॉलेजला नॅक समितीने नुकतीच भेट दिली. या भेटीत समितीने महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सामाजिक, विद्यार्थी केंद्रित तसेच सर्व लाभार्थींसाठी केलेल्या समग्र कार्यांची निरीक्षणे केली. बंगळुरूच्या राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन संस्थेमार्फत (नॅक) प्रत्येक पाच वर्षामधून एकदा तपासणी केली जाते.

सिंहगडच्या एन. बी.नवले वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या गुणवत्ता तपासणीसाठी अशा प्रकारची त्रिसदस्य समिती नॅकने नियुक्त केली होती. त्यामध्ये सयाजीराव विश्वविद्यालय बडोदा गुजरातचे कुलगुरू प्रा. डॉ. परिमल व्यास (अध्यक्ष), डॉ. पीटर डेविड (समिती समन्वयक), कोचीन विज्ञान व तंत्रज्ञान विश्वविद्यालय कोचीन केरळचे कुलसचिव प्राचार्य डॉ. मस्थानैया ( सदस्य), डी. के. शासकीय महिला महाविद्यालय नेल्लोर आंध्र प्रदेश यांचा समावेश होता.

या समितीने दि.29 व 30 ऑक्टोबर 2018 रोजी प्रत्यक्ष भेट दिली होती. यामध्ये त्यांनी विविध तांत्रिक गोष्टी व कागदपत्रांची पहाणी, आजी व माजी विद्यार्थी, पालक यांच्याशी चर्चा केली होती. महाविद्यालयाचे शैक्षणिक कामकाज, संशोधन व सामाजिक कार्य, महाविद्यालयातील सर्वोत्तम प्रथा यांचे विषयी चर्चा करून भविष्यकालीन शैक्षणिक विकास प्रभावीपणे साधण्यासाठी व सुधारणासाठी काही सूचना केल्या. यामध्ये सर्वोत्तम प्रथा म्हणून हर्वर्ड बिझनेस रिव्ह्यू बरोबर केलेल्या सामंजस्य कराराविषयी विशेष कौतुक केले. सदरचा करार हा सिंहगडचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले व सचिव डॉ. सुनंदा नवले यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनानुसार सिंहगडच्या महाविद्यालयांमधून राबविला जातो. तसेच विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रम (एस. टी. पी.) राबविला जातो. राष्ट्रीय सेवा योजना व अन्य समाजोपयोगी कार्यक्रम महाविद्यालयात राबविले जातात. या सर्व बाबींचा अभ्यास करून निरीक्षणानुसार त्यांनी बंगलोरला अहवाल सादर केला होता.

नुकत्याच स्थायी समितीच्या ३४ व्या बैठकीमध्ये सदरच्या अहवालास मान्यता देऊन 2.35 गुण (सी.जी.पी. ए.)`ब` श्रेणी मान्य केल्याचे कळविले आहे. सदरच्या कामकाजामध्ये सिंहगडचे व्यवस्थापन मार्गदर्शक व संकुल संचालक प्रा. डॉ.माणिक गायकवाड व सिंहगड लोणावळा कॅम्पसमधील सर्व प्राचार्य, सेवक, महाविद्यालयातील नॅक समन्वयक, प्रा. राजेश कांझाडे, अंतर्गत गुणवत्ता कक्षच्या समन्वयक प्रा.उर्मिला पाटील, प्रा. दीपक उंबरकर व सर्व संबंधित घटकांनी विशेष परिश्रम सांघिकरित्या घेतल्याचे प्राचार्य डॉ. जयवंत देसाई यांनी सांगितले. भविष्यकालीन योजनांमध्ये पथकाने केलेल्या सदर सूचनांचा आदर करून महाविद्यालयाच्या कामकाजामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत, तरीही आव्हानाची जाणीव गरजेची आहे असे सर्वांना वाटते. तसेच सांघिक प्रयत्न केल्यास पुढील पाच वर्षांमध्ये गुणवत्ता वाढ सहज शक्य असल्याचे सर्व सेवकांना वाटत असल्याची माहिती प्राचार्यांनी दिली.

नॅक समिती काय करते

भारत पातळीवरील व परराज्यांमधील तज्ञांमार्फत ही पडताळणी केली जाते. तसेच प्रथम स्वयंमूल्यमापन अहवालास मान्यता, विद्यार्थी समाधान सर्वेक्षण, माहिती मधील विसंगत गोष्टींची शहानिशा व सर्वात शेवटी महाविद्यालय परिसरास तज्ञांमार्फत प्रत्यक्ष भेट देऊन सर्व माहितींची वैधता तपासणी अशा प्रकारच्या प्रक्रियांमधून महाविद्यालयास जावे लागते.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3