BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : राजमाची पाॅईट येथून पडल्याने युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – खंडाळ्यातील राजमाची पाॅईट येथून द्रुतगती मार्गावर पडल्याने एका अनोळखी युवकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे.

लोणावळा शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी युवकाचे वय अंदाजे 28 ते 34 दरम्यान आहे. त्याच्या हातावर ओम गोंदवलेला आहे. अंगावर निळा व चाॅकलेटी रंगाचा चेक्सचा फुल शर्ट, क्रिम रंगाचे पॅन्ट असून उंची पाच फुट दहा इंच आहे.

हा युवक कसा पडला? तसेच तो कोण आणि कुठला आहे? याचा शोध लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पाटणकर व पोलीस काॅन्स्टेबल सागर धनवे हे करत आहे. वरील वर्णनाच्या युवकाविषयी कोणाला माहिती असल्याने लोणावळा शहर पोलीसांना 02114 – 273033 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like